Dainik Maval News : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका ह्या संघटनेने केलेल्या मागणीला यश आले आहे. मावळ तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांत रविवारी (दि. ७ सप्टेंबर) रोजी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती आता साजरी केली जाणार आहे. तसा आदेश स्वतः तहसीलदार यांनी दिला आहे.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती 7 सप्टेंबर 2025 रोजी असून या दिवशी रविवार आहे. रविवार येत असल्यामुळे शासकीय कार्यलय यांना सुट्टी असते. त्या अनुषंगाने गुरुवारी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका यांच्याकडून तहसील कार्यालयात जात नायब तहसीलदार गणेश तळेकर व गटविकास अधीकारी पंचायत समिती मावळ वडगांव यांना रविवारी राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी व्हावी या करीता निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका उपाध्यक्ष सुमित चुकाटे, सचिव शाम लांडगे व रिल्स स्टार शुभम चव्हाण उपस्थित होते.
निवेदनाच्या अनुषंगाने याबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी तालुक्यातील सर्व प्रमुख सरकारी आस्थापना, कार्यालये यांना आदेश पाठविला असून त्यात शासकीय कार्यालयांमध्ये क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्याबाबत सांगितले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाबाबत पीएमआरडीए कार्यालयात विशेष आढावा बैठक संपन्न
– मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार । Maratha Reservation
– आनंदाची बातमी ! ‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू ; सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची संधी