Dainik Maval News : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेतील समाजशास्त्र विषयाचे शिक्षक राजकुमार भरत वरघडे यांना अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र शिक्षक रत्न पुरस्कार देऊन पन्हाळा, कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिक्षक नेते धनंजय नांगरे, मावळ शिक्षक परिषद अध्यक्ष राम कदम बांडे, मावळ शिक्षक पतसंस्था अध्यक्ष भारत काळे, रियाज तांबोळी, गणेश ठोंबरे, दिपक डांगले, रविंद्र सुरसावत उपस्थित होते.
शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी वरघडे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच मावळ तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश