मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर आणि निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नवीन प्रशासकीय इमारततीतील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी ईव्हीएम नोडल अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वय अधिकारी निळकंठ पोमण, सह उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ( Randomization of voting machines for Maval Lok Sabha Constituency election completed )
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण 2 हजार 566 मतदान केंद्रांसाठी 9 हजार 236 बॅलेट युनिट, 3 हजार 591 कंट्रोल युनिट आणि 3 हजार 816 व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली.
अधिक वाचा –
– तळेगाव येथे मावळ लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने 130 अधिकारी कर्मचाऱ्यांना EVM हाताळणीचे प्रशिक्षण । Maval Lok Sabha
– रक्तदान शिबिरापासून ते वधू-वरांसाठी लकी ड्रॉ, वडगावात अगदी थाटामाटात पार पडला सामुदायिक विवाहसोहळा । Maval News
– कान्हे गावातील धक्कादायक प्रकार ! प्रसिद्ध गाडा मालकाच्या गोठ्यातील गायीवर ॲसिड हल्ला । Maval News