व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महादेव जानकरांचा ‘स्वबळाचा’ नारा, लोकसभेच्या सर्व जागा लढणार, भाजपवर घणाघात, स्वतःसाठी मनात बारामती फिक्स?

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसुराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज (29 ऑगस्ट) पुण्यात झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 29, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश, पुणे, शहर
Mahadev-Jankar

Photo Courtesy : Bhupal Pandit


पुणे : “राज्यात आज भाजपने मित्रपक्ष फोडले. पण काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी पण छोट्या पक्षांना खाण्याचच काम केलं. ज्यांना आम्ही सत्तेत बसवलं त्यांना खाली खेचायची ताकद देखील आमच्यात आहे,” असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला. तसेच स्वतःच घर मजबूत करा अन् रासपचं सरकार आणा, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसुराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज (29 ऑगस्ट) पुण्यात झाला. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचा 20 वा वर्धापन दिन गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा करण्यात आला. यावेळी देशाभातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना माहादेव जानकर बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष एस एल अक्की सागर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने,पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजित पाटील, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष गणेश लोंढे, जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर यांच्यासह रासाप चे दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिनाडू, गुजरात, राजस्थान सह देशभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, “या क्षणाला राष्ट्रीय समाज पक्ष मोठा कसा करायचा आणि रासपची दिल्ली आणि राज्यात शासन कसं येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वीस वर्षाच्या कार्यकाळात रासापने 4 आमदार, 95 जिल्हा परिषद सदस्य, बेंगलोर, आसाम गुजरातमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. टप्पा टप्प्याने आमची प्रगती चालू आहे. त्यामुळे आम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाहीये. आगामी लोकसभा निवडणुकीच्या देशातील 543 जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत, याचा पुनरुच्चार केला. तसेच मिर्झापूर (उत्तर प्रदेश), परभणी, माढा, बारामती यापैकी एका ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.”

तसेच, “आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करताना सर्व जातीच्या आणि समाजाच्या लोकांना सोबत घ्या असे सांगत सत्तेत आल्यानंतर सर्वांना समान वाटा देऊ” असेही जानकर यांनी सांगितले. यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले, “परभणी जिल्ह्यात आमचे संख्याबळ आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर आम्ही नक्कीच रासपचा झेंडा नक्की फडकवू. त्यामुळे परभणीत आम्ही कोणासोबत युती करणार नाही. तसेच जानकर परभणीतून लोकसभा लढले तर आपण पूर्ण ताकद लावू आणि त्यांना लोकसभेत पाठवू” असेही त्यांनी सांगितले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा! पाहा काय आहे दिनविशेष
– कामशेत पोलिसांकडून आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण; विद्यार्थ्यांना नशेच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन
– तळेगावातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये अधिकारी असल्याची बतावणी करून दीड लाखांची फसवणूक


dainik maval jahirat

Previous Post

शेतकऱ्यांनो..! खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हा; जाणून घ्या स्पर्धेचे नियम, आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया आणि बक्षिसाची रक्कम

Next Post

मावळ तालुक्यात शिवसेना उ.बा.ठा. पक्षाची नव्याने बांधणी; गट आणि गण स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, पाहा यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shiv-Sena-Uddhav-Balasaheb-Thackeray-Party

मावळ तालुक्यात शिवसेना उ.बा.ठा. पक्षाची नव्याने बांधणी; गट आणि गण स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.