राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यात येते. या लाभार्थ्यांनी धान्य घेतल्यानंतर स्वतंत्र पावत्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. ( Ration Card Check Information How Much Grain Is Available On Card )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजनेकरीता प्रती शिधापत्रिका 15 किलो गहू, 20 किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेकरीता प्रती लाभार्थी 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ वितरीत करण्यात येते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेकरीता प्रती लाभार्थी 2 किलो गहू, 3 किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेकरीता प्रती लाभार्थी 1 किलो गहू व 4 किलो तांदूळ वितरीत करण्यात येते.
लाभार्थ्यांनी योजनानिहाय मिळणाऱ्या धान्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या http://mahafood.gov.in या संकेतस्थळावर बारा अंकी शिधापत्रिका क्रमांक टाकल्यास होणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी दोन्ही धान्य मिळाल्यानंतर स्वतंत्र दोन पावती स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. ( Ration Card Check Information How Much Grain Is Available On Card )
(माहिती स्त्रोत – District Information Office Pune / FB)
अधिक वाचा –
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 62 हजाराहून अधिक सेवांची निर्गती
‘बँकेचे ग्राहक हेच बँकेचे मालक’, पवना सहकारी बँकेच्या वर्धापनदिनी नवीन मुख्य कार्यालय इमारतीचे उद्घाटन