Dainik Maval News : पाणंद रस्ते खुले करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील ३० वादग्रस्त रस्ते खुले करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात पोहोचणे सोपे झाले आहे.
शेतात सहज प्रवेश मिळावा आणि पाणंद रस्त्यांवरील अडथळे दर व्हावेत यासाठी आता मोफत पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाणार आहे. पूर्वी यासाठी शेतकऱ्यांना तीन ते चार हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असे. पोलिस बंदोबस्तासाठी लागणाऱ्या शुल्कामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडत होता. मात्र, गृह विभागाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास मोफत बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाणार असून यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.
गावागावांतील शेतरस्त्यांवर अतिक्रमण, न्यायालयीन वाद, वादग्रस्त पाणंद रस्ते आणि त्यामुळे शेतात प्रवेश न होण्याच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना भेडसावत होत्या. अनेक ठिकाणी यावरून वाद, भांडणे, तंटेही होत होते. या निर्णयामुळे अशा समस्यांवर तोडगा निघण्यास मदत होईल. जमिनीच्या सीमारेषा व रस्त्यांवरील वाद कमी होतील. शेतीची कामे सुरळीत होणार असल्याने उत्पादनक्षमतेतही वाढ होण्याची अपेक्षा आहे.
मावळ तालुक्यातील सुमारे ३० वादग्रस्त रस्ते खुले करण्यात आले आहेत. कुणी शेतरस्ता किंवा पाणंद मार्ग अडवला असेल, तर संबंधितांनी तक्रार करावी. प्रशासन तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देईल. – विक्रम देशमुख, तहसीलदार, मावळ
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! गणेशोत्सव काळात भारतीय रेल्वेच्या गणपती विशेष ३८० फेऱ्या, पाहा संपूर्ण नियोजन
– तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय ; आमदार सुनील शेळकेंच्या उपस्थितीत बैठक
– मोठा निर्णय ! मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (क्रमांक 48) बोरघाट भागात जड-अवजड वाहनांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश