मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायतीनी पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना अवास्तव घरपट्टी आकारणी केली असून ती त्वरित कमी करावी, अशी मागणी मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेने केली आहे. मावळ तालुका पोल्ट्री संघटनेची विशेष सभा रविवारी वडगाव येथे संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य पोल्ट्री संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे गुरुजी, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिव प्रवीण शिंदे, महेश कुडले, विनायक बधाले, सचिन आवटे, संभाजी शिंदे, बाबाजी पाठारे पंढरीनाथ खरमारे, सुरेश खरमारे, शिवाजी शिंदे, शिवाजी कारके, श्रीरंग सुतार, गणेश आलम, राजेंद्र आलम आदी उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीची नियमावली बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना अन्यायकारक अशी कर आकारणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सोनबा गोपाळे यांनी सांगितले. ती कमी करण्याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन साकडे घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी आभार मानले. ( Reduce unreasonable rents of poultry traders Maval Taluka Poultry Yoddha Association )
अधिक वाचा –
– आता घरबसल्या आणि मोबाईलवर मिळवा ग्रामपंचायतींचे दाखले, जाणून घ्या
– महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत संकेत चव्हाण, प्रसाद सस्ते विजयी