Dainik Maval News : सन 2024-25 करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ स्तरावरुन सुरु आहे.
प्रस्तुत योजनेला मिळत असलेला प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणीची सुविधा (अर्ज करण्यासाठी) https://register.mshfdc.co.in या पोर्टलवर 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News