संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर या ठिकाणी आज (गुरुवार, 26 जानेवारी) देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमन कांचन लक्ष्मण भालेराव यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. ( Republic Day celebrated With Enthusiasm At Sankalp English School At Pavanangar Maval )
तर, संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव, कविता कालेकर, संचालिका विद्या गांधी, मुख्याध्यापक राहुल सोनवणे आणि उपस्थित मान्यवर आणि पालकांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विद्यार्थ्यांनी भाषणे, समूहगीत, नृत्य आणि लेझीम आदी कार्यक्रम यावेळी सादर केले. कार्यक्रमासाठी कांतीलाल देशमुख, मंगेश कालेकर, प्रतीक भालेराव, प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, विठ्ठल दळवी, नितीन गायकवाड, प्रमोद जगताप, संपत आडकर, जावेद मुलाणी, सादिक शेख, उमेश पडवळ, नीलेश गायकवाड, अजय गायकवाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘तिरंग्यासाठी हजारोंचे बलिदान, तो पायदळी जाऊ नये’, राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची विशेष मोहीम
– मोठी बातमी! केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ 12 मान्यवरांचा समावेश