Dainik Maval News : अनेक दिवसांपासून आपल्या नगरपरिषद, नगरपंचायतीचे आरक्षण काय ठरणार, याची उत्सुकता असलेल्या नागरिकांना अखेर आज याचे उत्तर मिळाले आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य प्रशासनाने तयारीचा वेग वाढवला असून सोमवारी ( दि. ६ ) राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यातील नगराध्यक्षपदांसाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.
247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यापैकी 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदा अनुसूचित जातीतील महिलांसाठी, 7 नगरपरिषदा अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 34 नगरपालिका ओबीसी महिलांसाठी तर 68 नगरपालिका खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मावळमधील परिस्थिती :
मावळ तालुक्यात लोणावळा, तळेगाव दाभाडे या दोन नगर परिषदा असून वडगाव मावळ, देहू या दोन नगरपंचायती आहे. या चारही ठिकाणचे आरक्षण जाहीर झाले आहे.
नगरपरिषदा आरक्षण ;
लोणावळा – एससी प्रवर्ग ( SC Open )
तळेगाव दाभाडे – खुला प्रवर्ग ( Open )
नगरपंचायत आरक्षण ;
वडगाव मावळ – खुला महिला ( Open Women )
देहू – खुला महिला ( Open Women )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय