मावळ तालुक्यातील कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्र ( Primary Health Centre ) येथे निवासी डॉक्टर नसल्याने परिसरातीलच एका भगिनीच्या नवजात अर्भकाचा मृत्यू ( Newborn Infant Death ) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण पसरले होते. भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी घटनेची चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अन्यथा उपोषण करु असा इशारा दिला होता. अखेर आता कामशेत आरोग्य केंद्रातील त्या निवासी डॉक्टरची बदली करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासी डॉक्टर किरण जाधव यांची बदली करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयुष प्रसाद यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जाधव डॉक्टरांची तात्काळ बदली केली आहे.
हेही वाचा – निवासी डॉक्टर नसल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू, कामशेतमधील धक्कादायक प्रकार
कामशेत शहर ( Kamshet ) गावठाणमध्ये राहणारी एक गरोदर महिला प्रसुती वेदना सुरु झाल्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, या केंद्रावर रात्री निवासी डॉक्टर ( Resident Doctor ) उपलब्ध नव्हते. त्यामुळे तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, मात्र सिझर झाल्यानंतर तिच्या नवजात बाळाचा लगेचच मृत्यू झाला होता. ( Resident Doctor Of Kamshet Primary Health Centre Transfered After Newborn Infant Death )
अधिक वाचा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामशेत शहर येथे मिठाई वाटप
आमदार शेळके ते माजी आमदार भेगडेंपर्यंत, तालुक्यातील ‘या’ नेत्यांनी मोदींना म्हटले ‘हॅपी बर्थडे मोदीजी’, पाहा यादी