व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval

विकास आराखड्यात बदल करण्याची मागणी वडगाव शहर भाजपाने नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 28, 2025
in लोकल, शहर
revised development plan of Vadgaon Maval city Villagers strongly oppose BJP statement to CEO

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतने प्रसिद्ध केलेला विकास आराखडा बिल्डर लॉबीला धार्जिणा असून त्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याचे सांगत, विकास आराखड्यात बदल करण्याची मागणी वडगाव शहर भाजपाने नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्याधिकारी डॉ. निकम यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, वडगाव नगरपंचायतीचा नुकताच दुसरा विकास आराखडा प्रसिध्द झाला आहे. सदर वडगाव शहराचा विकास आराखडा हा सामान्य जनतेवर अन्याय कारक असून तो धनदांडग्यासाठी धार्जिना आहे. वडगाव मावळ येथील पोटोबा महाराज दत्त, महादेव, मारूती देवस्थानास शासनाचा ‘क’ दर्जा प्राप्त झालेला आहे. सदर देवस्थान हे तालुक्याचे श्रध्दास्थान आहे. भविष्याचा विचार करिता धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी जागेची आवश्यकता भासणार आहे, तरीही श्री पोटोबा देवस्थानच्या जमिनीवर तीन – तीन ठिकाणी आरक्षण टाकून सदर जागा बाधित केलेली आहे. आजुबाजुचे धनदांडगे बांधकाम व्यावसायिक यांच्या जागा शाबुत ठेवून देवस्थानच्या जागा मात्र आरक्षण टाकून बाधित केलेल्या आहेत.

सदर विकास आराखड्यामध्ये जैन बांधवाचे श्रध्दास्थान असलेले आणि साधुसंतांचे निवासस्थान असलेले तळ्याजवळील जैन स्थानक या वर जाणून बुजुन नव्याने आरक्षण दाखविण्यात आलेले आहे. तरी तमाम जैन बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर करून जैन स्थानकावरील आरक्षण तत्काळ हटविण्यात यावे ही मागणी देखील करण्यात आली.

वडगाव बाजारपेठेतील जुना पुणे मुंबई महामार्ग बाजारपेठेमध्ये पूर्व बाजूकडून वडगांव गावठाण हद्दीमध्ये पुढे वडगांव कोर्ट गेट नंबर १ पर्यंत १२ मीटर रूंदीचा असावा तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील गावठाण हद्दीतील श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर जवळील अंतर्गत रस्ता देखील ९ मीटर ऐवजी ६ मीटर करावा ही देखील आमची मागणी असल्याचे या निवेदनात नमूद केलेली आहे.

अनेक नागरिकांनी देखील यांचा आरक्षणाच्या बाबतीत असलेल्या तक्रारी या निमित्ताने नमूद केल्या तसेच नको असलेले आरक्षण तातडीने हटवावे अशी विनंती केली आहे. याप्रसंगी तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, विश्वस्त सचिव अनंता कुडे, वडगांव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, विश्वस्त सुभाषराव जाधव, अरुण चव्हाण यांसह अनेकांनी आपली सार्वजनिक प्रश्नांबाबत भूमिका स्पष्टपणे मांडली.

ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर पगडे, प्रभाकर वाघमारे, पत्रकार विजय सुराणा, महादेव वाघमारे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे, मा.नगरसेवक किरण म्हाळसकर, भूषण मुथा, अनिल गुरव , मारुतीराव चव्हाण, जयसिंग चव्हाण, मधुकर चव्हाण, रामचंद्र चव्हाण, जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा, राजेश बाफना,अशोकलाल गुजराणी, गणेश भेगडे, विनायक भेगडे,रमेश ढोरे, गणेश दंडेल, शेखर वहिले, झुंबरलाल कर्नावट, अनिल बाफना,सुरेंद्र बाफना,डॉ.कुंदन बाफना,दिलीप मुथा,अमोल बाफना, अमित मुथा,रोहन मुथा,सौरभ दुगम, प्रशांत चव्हाण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरूंद आणि धोकादायक ! तातडीने रुंदीकरण, डागडुजी करण्याची मागणी । Lohgad Fort
– मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली
– शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर


Previous Post

9890616089 हा नंबर सेव्ह करा; तक्रारीची प्रभावी व्यवस्था होण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेकडून व्हॉट्सॲप क्रमांक । Talegaon Dabhade

Next Post

देहूरोड : श्री शिवाजी विद्यालयात अंमली पदार्थ विरोध दिनानिमित्त जनजागृती । Dehu Road News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Awareness campaign on occasion of Anti-Drug Day at Shri Shivaji Vidyalaya Dehu Road

देहूरोड : श्री शिवाजी विद्यालयात अंमली पदार्थ विरोध दिनानिमित्त जनजागृती । Dehu Road News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.