पवनानगर – गेल्या काही वर्षापासून मावळ तालुक्यात पावसाचा लहरीपणा, लागवडीचा बदलत चाललेला कालावधी, मजूरांचा तुटवडा, बहुतांशी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील तरुणांचा भात शेती करण्याकड़े निरुत्साह व शेतजमीनी विक्रीचे वाढते प्रमाण अशा विविध कारनामुळे भातशेती व उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागल्याचे दिसू लागले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे भात शेती करताना पारंपरिक पद्धती ऐवजी चारसूत्री व सगुणा राइस तंत्र या आधुनिक पद्धतिने भातशेती करण्यास शेतकरी प्राधान्य दिले जात होते. परंतु आता मावळ मधील शेतकरी त्याच्या ही पुढे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून भात लागवड करू लागले आहेत. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पवनमावळ भागातील कोथुर्णे, येळसे, ब्राह्मणेली, वारू, काले इ. गावात ह्यावर्षी यंत्राने मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचे नियोजन पवनमावळ कृषि विभागाने केले आहे. ( rice being cultivated by farmers with help of machines In maval taluka )
कोथुर्णे इथे प्रगतशील शेतकरी दत्तू नढे यांच्या शेतावर सहायक कृषी अधिकारी सुनील गायकवाड व विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिकीकरण द्वारे भात लागवड करण्यात आली. ह्यावर्षी भात लावणी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली यंत्राने केल्यामुळे वेळ, ऊर्जा आणि पैसाची बचत होऊन उत्पादन वाढ होणार असल्याचे प्रगतशील शेतकरी दत्तू नढे आणि कृषि अधिकारी सुनील गायकवाड यांनी सांगितले.
मावळातील शेतकरी प्रामुख्याने भात लागवडी साठी पारंपरिक पद्धत भात लागवड पद्धत, चारसूत्री पध्दत आणि एस.आर.टी. ह्या पद्धती मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. परंतु गेल्या तीन वर्षांपासून कृषि विभागाने आत्मा योजने अंतर्गत यंत्राने लागवडीचा प्रचारप्रसार केल्याने भात लावणी यंत्राने करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या कृषि यांत्रिकीकरण योजनेतून भातलागवडीसाठी यंत्र खरेदी करावीत असे, आव्हान दत्तात्रय पडवळ, तालुका कृषी अधिकारी मावळ व प्रशांत दहाळे मंडळ कृषि अधिकारी, काळेकॉलनी यांनी केले.
“सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून भात उत्पादन वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञान प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे, उत्पादन खर्च कमी करणे, मजूर व वेळ कमी करणे, हा मूळ उद्देश यंत्राद्वारे लागवड करण्याचा आहे” – दत्तात्रय पडवळ (तालुका कृषि अधिकारी, मावळ)
अधिक वाचा –
– ‘माझं वडगाव माझं व्हिजन’ अभियानाद्वारे मनसेने जाणून घेतली तज्ञांची मते; शहराच्या विकासासाठी बनवणार ‘ब्लूप्रिंट’!
– राज्यात टोमॅटोच्या दरवाढीने नागरिक हैराण, कृषि आयुक्तांकडून उपाययोजनांसाठी तातडीची बैठक
– पवना धरण 30 टक्के भरले! पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, गेल्यावर्षी आजच्या तारखेला होता ‘इतका’ पाणीसाठा