रिक्षा आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाल्याची घटना चाकण-शिक्रापूर रोडवर घडली आहे. सोमवारी (दिनांक 21 ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवरील रासेफाटा इथे हा अपघात घडला. ऋषिकेश रवींद्र पवार (वय 20, रा. कान्हे फाटा, ता. मावळ) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अश्विन दत्ता धामणकर (वय 23, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) आणि तुषार रमेश पवार हे दोघेजण जखमी झाले आहेत. अश्विन यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी फिर्यादीवरुन रिक्षाचालक सौरभ शंकर मुंगसे (22, रा. रासे, ता. खेड) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अश्विन आणि त्यांचे दोन मित्र तुषार व ऋषिकेश हे ट्रिपलसीट चाकण-शिक्रापूर रोडने जात होते. त्या वेळी शिक्रापूर-चाकण रोडने आरोपी सौरभ त्यांच्या ताब्यातील रिक्षा घेऊन जात होते. रासेफाटा इथे सौरभ याने अचानक रिक्षा वळवल्याने फिर्यादी यांच्या दुचाकीची रिक्षाला धडक बसली. यामध्ये ऋषिकेश हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. ( Rickshaw and bike accident one bike rider killed Incident on Chakan Shikrapur Road )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– सह्याद्रीचा दुर्गसेवक हरपला! अमित जाचक यांचे इंदुरीजवळ अपघाती निधन, मावळ तालुक्यातील युवावर्गावर शोककळा
– सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा
– महागाव ग्रामपंचायतीमध्ये 35 ठिकाणी सौर पथदिवे; आता रात्री वीज गेल्यावरही गावात असणार प्रकाश