Dainik Maval News : नायगाव येथील चोपडे दाम्पत्याच्या अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण मावळात संतापाची लाट उसळली. त्यात महामार्ग संबंधित विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी संबंधित विभागाला आणि प्रशासनाला लेखी निवेदन देवून आपल्या विविध मागण्या कळविल्या होत्या. अखेर शुक्रवारी (दि.11) हजारो ग्रामस्थांनी आक्रमक होत मुंबई – पुणे महामार्ग तब्बल दीड तास रोखून धरला. यावेळी ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला मागण्यांचे गांभीर्य दाखवून दिले.
शनिवारी (दि.5) रात्री साडेदहाच्या सुमारास चोपडे दाम्पत्याचा अपघात झाला होता. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यास अटकही करण्यात आली आहे. परंतु, महामार्गावर सतत होणार अपघात आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कामशेत ते वडगाव दरम्यान सर्व्हिस रोड करणे सोबत इतर मागण्यांचे निवेदन एमएसआरडीसी अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासना यांना देण्यात आले.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या काय?
1. कान्हे ते कामशेत, कामशेत ते कान्हे फाटा सर्व्हिस रोड करणे.
2. नायगाव गावाजवळील महामार्गावरील तीव्र चढउताराचे क्रॉसिंग सपाट करणे.
3. नायगाव येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महामार्गावर उड्डाणपुल बांधणे. सध्या तात्पुरत्या लोखंडी पूल करणे.
4. रस्ता क्रॉसिंगवर स्पीड ब्रेक बसविणे.
5. नायगाव येथील पेट्रोल पंपाजवळील अनधिकृत दुभाजक बंद करणे.
सातत्याने होतायेत अपघात –
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे चक्र काही थांबत नाही. काही दिवसांपूर्वी शिलाटणे फाटा येथे नवनाथ भुंडे आणि विद्या भुंडे दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाला होता. तर, चालू आठवड्यात नायगाव येथील गणेश चोपडे आणि अर्चना चोपडे दाम्पत्याचा अपघातात बळी गेला. काही दिवसांपूर्वीच पाथरगाव पुलाजवळ भरधाव चारचाकीचा धक्का लागून औंढे येथील स्वप्नील चव्हाण, त्यांची आई व एक मुलगा अपघातात जखमी झाले. यासह महामार्गावर अनेक लहान मोठे अपघात होतच आहेत.
मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव फाटा ते वाकसई फाटा दरम्यान अनेकदा अपघात होऊन अनेक निष्पापांचे जीव गेले आहेत. वारंवार होणारे अपघात पाहता, त्याची कारणे शोधणे, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु संबंधित विभाग आणि प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वंदन दुर्गांना । वडीलांना आदर्श मानून ‘ती’ डॉक्टर झाली ; जिद्दीने निखिलेशाताईंनी स्वतःचं नवं अस्तित्व बनवलंय । Dr Nikhilesha Shete
– भारताचा कोहिनूर हरपला ! प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Industrialist Ratan Tata Dies
– मोठी बातमी ! इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन