Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सांगिसे येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय सांगिसे या विद्यालयात लायन्स क्लब ऑफ भोसरी यांच्या सोजन्याने ग्रामीण भागातील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन डिस्पेंसरी व डिस्पोजल यंत्रणेची अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दोन्ही मशीनचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, क्लबचे माजी प्रांतपाल बाळकृष्ण जोशी व अध्यक्षा मनिषा माने यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी सुस्थितीतील एक लॅपटॉपही शाळेस उपलब्ध करून देण्यात आला. विद्यालयातील मुलींसाठी ही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून याचा विनियोग विद्यार्थीनींनी करावा, असे आवाहन यावेळी प्रमुख पाहुण्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास माजी प्राचार्य शैलजा सांगळे, रूपाली बिराजदार, श्यामकुमार माने, बीना जोशी यांची उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता वंजारी व शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा जयश्री गरुड यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार