शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांना भेटी देत आहेत. आज (दि. 4) मावळ लोकसभा (Maval Lok Sabha) मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा झंझावात पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभेत आज तीन जाहीर सभा घेतल्या. यातील पनवेल (Panvel) येथील सभेत बोलताना ठाकरेंनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere) हे अधिकृत उमेदवार असतील, असे सुचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीच्या घोषणेसह उद्धव ठाकरे यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
संजोग वाघेरे यांच्या रुपाने चांगला पर्याय दिला – ठाकरे
‘शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मागे सर्वजण आता निष्ठेने एकत्र आले आहेत. मी साध्या कार्यालयाच्या उद्घाटनाला येथे आलो तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. तर विजयाच्या मिरवणुकीला किती गर्दी जमा होईल? संजोग वाघेरे यांच्या रूपाने तुम्हाला चांगला पर्याय दिला आहे. एक मर्द तुम्हाला दिला आहे. आपल्याकडे काहीही नसताना संजोग वाघेरे हे आपल्याकडे आले. ते सत्ता आणण्यासाठी आपल्या पक्षात आले,’ असे उद्धव ठाकरे पनवेल येथील सभेत म्हणाले. ( Sanjog Waghere Will Be Shiv Sena Uddhav Thackeray Party Candidate In Maval Lok Sabha Constituency )
जनसंवाद । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । पनवेल – #LIVE https://t.co/hkaMWyFXVu
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 4, 2024
अनंत गिते यांच्याकडूनही उमेदवारीचा उल्लेख –
पनवेल येथील सभेत उद्धव ठाकरे यांच्यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी देखील मावळच्या उमेदवाराचा उल्लेख केला. अनंत गीते यांनी आपल्या भाषणात मावळ लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या नावाचा उल्लेख केला. अनंत गीते यांनी म्हटले की, जशी मला रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे, तशीच संजोग वाघेरे यांची देखील उमेदवारी निश्चित झाली आहे.
उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका –
मावळ लोकसभेतील सभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्षाचे सरकार या देशात पुन्हा निवडून आले तर या देशाची ही शेवटची निवडणूक ठरेल, असे म्हणत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मी पुन्हा येईल या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. पुन्हा येण्याचा आत्मविश्वास असेल तर पक्ष का फोडतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुमच्यावरील संकटाच्या काळात तुमच्या सोबत उभ्या राहिलेल्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तुम्ही संपवायला निघालात, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
अधिक वाचा –
– ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान : अंतिम निकाल जाहीर, शासकीय गटात साखरा शाळा प्रथम, खाजगी गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूलची बाजी
– मावळ दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदे यांची जबरदस्त खेळी, खासदार बारणेंना होणार फायदा । Maval Lok Sabha
– तळेगाव दाभाडे शहरात आमदार सुनिल शेळकेंचा झंझावात! एका दिवसात 17 ठिकाणी भूमिपूजन आणि नागरिकांशी संवाद