“संकल्प नशामुक्ती” अभियानाच्या माध्यमातून लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत गां’जा या माद’क पदार्थाचे सेवन करत असताना मिळून आलेल्या 8 नशेखोरांवर गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करत तात्काळ तपास करुन दोषारोप पत्रासह आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी 1000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 7 दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. ( Sankalp Nashamukti Lonavala City Police Action Against 8 Drug Addicts )
पोलिसांची तत्परता आणि कोर्टाच्या निर्णयाने नशेखोरांचे धाबे दणाणले असून यापुढे कोणी नशेखोर दिसून आल्यास तात्काळ लोणावळा शहर पोलीस स्टेशनला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी प्रत्येक प्रकारच्या नशेपासून अलिप्त राहून आपली आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहान करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक अंकित गोयल – पुणे ग्रामीण आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक – लोणावळा उपविभाग यांच्या संकल्पनेतून सदर ‘नशामुक्ती’ राबवण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशान्वये आणि अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिताराम डुबल – लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या सुचनेनुसार पोलिस हवालदार जयराज पाटणकर, पोलिस नाईक हनुमंत शिंदे, पोलिस शिपाई गायकवाड, पोलिस शिपाई पाटील यांनी केली असून कोर्ट पैरवी म्हणुन पोलिस नाईक सुधीर डुंबरे यांनी कामकाज पाहिले. ( Sankalp Nashamukti Lonavala City Police Action Against 8 Drug Addicts )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आधी निर्यातशुल्कात 40 टक्के वाढ, त्यानंतर कांद्याबाबत केंद्र सरकारचा दुसरा मोठा निर्णय, लगेच वाचा…
– मोरया प्रतिष्ठानकडून वडगावात पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा, पहिलं बक्षीस 7 हजार रुपये, वाचा स्पर्धेचे नियम । Vadgaon Maval
– सुदवडी गावातील साई-सृष्टी नगरात अंतर्गत रस्त्याची दुर्दशा, स्थानिकांनी स्वखर्चाने केली तात्पुरती सुधारणा