Dainik Maval News : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू यांनी हा मान पुणे जिल्ह्यास दिला आहे. श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद आणि हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांनी ही माहिती दिली.
- श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारूतीबाबा कुऱ्हेकर महाराज आणि वारकरी रत्न हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या नेतृत्त्वाने गाथा पारायण सोहळा येत्या ९ मार्च ते १७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. भंडारा डोंगराच्या पायथ्याला हा सोहळा होईल. या पारायण सोहळ्यासाछी १५ हजार भाविक वाचक म्हणून सहभागी होणार असून मुख्य सोहळा तुकाराम बिजेच्या दिवशी होणार आहे. या दिवशी राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक गाथा पारायण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. जवळपास १०० एकर जागेवर हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यामध्ये दररोज ५००० गाथा वाचक सहभागी होतील. रोज १००० टाळकरी असतील. २५ मृदंगवादकांचा समावेश असेल.
येत्या ९ मार्च पासून हा सोहळा सुरू होणार आहे. रोज सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी सहा वाजता कीर्तन होईल. कीर्तन सोहळ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
९ मार्च – हभप रवींद्र महाराज ढोरे (स. ११), हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर (सायं. ६)
१० मार्च – हभप सागर महाराज शिर्के (स. ११), हभप पोपट महाराज कासारखेडेकर (सायं. ६)
११ मार्च – हभप दशरथ महाराज मानकर (स. ११), हभप एकनाथ महाराज सदगीर (सायं. ६)
१२ मार्च – हभप शिरीष महाराज मोरे (स. ११), हभप चंद्रशेखर महाराज देगलूरकर (सायं. ६)
१३ मार्च – हभप चंद्रकांत महाराज वांजळे (स. ११), हभप महादेव महाराज राऊत सायं. ६)
१४ मार्च – हभप नितीन महाराज काकडे (स. ११), हभप बंडातात्या कराडकर (सायं. ६)
१५ मार्च – हभप चैतन्य महाराज देगलूरकर (स. ११), हभप रामभाऊ महाराज राऊत (सायं. ६)
१६ मार्च – हभप ज्ञानेश्वर माऊली कदम (स. ११), हभप जयवंत महाराज बोधले (सायं. ६)
बीजेला तीन लाख मांडे होणार
तुकाराम बीजेच्या दिवशी तीन लाख मांडे केले जाणार आहेत. मुळशीतील विविध गावांमधून पाच लाख पुरणपोळीचा प्रसाद दिला जाणार आहे. एक लाख भाकरी आणि विविध भागांमध्ये केली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची आमटी येथे अन्नदानात उपलब्ध असेल. बीजेच्या दिवशी सकाळी साडेनऊ ते अकरा या वेळेत वैकुंठ स्थानक, तुकाराम महाराजांचा वाडा, संस्थान देहू, भंडारा डोंगर संस्थान, भामचंद्र डोंगर, येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
आर्थिक मदत करू शकता..
येथे एक शीत दिधल्या अन्न। होय कोटी कुळाचे उद्धरण।
या सप्ताहामध्ये अन्नदान फार मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे या अन्नदानाच्या पवित्र कार्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहकार्य करू शकतात. श्री जगद्गुरू तुकोबाराय परिचारक संस्था या नावाने पंजाब नॅशनल बँकेमध्ये असलेल्या खात्यावर मदत करता येईल. हा योग पुन्हा २५ वर्षांनीच येणार आहे. समस्त मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरुर, पुरंदर, भोर, वेल्हा, तालुके, पिंपरी चिंचवड तथा पुणे महानगर पालिकेतील गावे व नगरे, समस्त पुणे जिल्हा यांच्यासाठी आयोजकांनी आवाहन केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री
– पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News
– चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News