Dainik Maval News : पवनानगर जवळील येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समिती अध्यक्षपदी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष गबळू राऊत यांची निवड करण्यात आली आहे.
शुक्रवारी (दि. २७ मार्च) रोजी येळसे येथील आरोग्य केंद्रात समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते ही निवड करण्यात आली. यासह या प्राथमिक आरोग्य केंद्राचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प श्री राऊत यांनी व्यक्त केला.
या केंद्रामार्फत आरोग्य सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचवणे, कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराच्या लसीकरणाची जनजागृती, आरोग्य केंद्रातील डॉक्टर, सिस्टर, आरोग्य सेविका, अधिकारी, पंचायत समिती सदस्य व समिती पदाधिकारी आदी सर्वांनी मिळून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात पारदर्शकता हेच आपले ध्येय असल्याचे राऊत यांनी सांगितले.
आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य केंद्र येळसे करिता रुग्णांना, गोरगरीब, गरजू, माता भगिनींची कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी अजून निधी आणू असाही विश्वास संतोष राऊत यांनी समिती सदस्यांना दिला.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्या शैला कालेकर, संजय मोहोळ, नवनाथ ठाकर, माऊली आढाव, हरीश काळे, दत्ता कोकरे, गोरख शेंडे, ओमकार काळे ,डॉक्टर आरोग्य सेविका कर्मचारी वर्ग ग्रामस्थ आधी मान्यवर उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण