व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनात सीसीटीव्ही अनिवार्य ; सहा वर्षांखालील मुलांच्या वाहनात महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती हवी

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे - पोलीस आयुक्त

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 12, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
school-bus

File Image


Dainik Maval News : शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

  • पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कुमार म्हणाले, शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेने घ्यावी याकरीता प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करावे. शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची पोलीस पडताळणी करुन घ्यावी. बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कुल बस चालक व अटेंडंट यांचे चारित्र्य पडताळणी, नेत्रतपासणी आणि वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.

शिक्षण विभागामार्फत शाळा स्तरावर परिवहन समिती स्थापन केल्याबाबतचा आढावा घ्यावा. स्कुल बसेसची वाहनांची कसून तपासणी करावी. खाजगी वाहनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबवावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम करीत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा, असेही कुमार म्हणाले.

भोसले यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान १ हजार ३२१ स्कूल बस तसेच ६५० इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये ४१४ स्कूल बस व २०८ इतर वाहने दोषी आढळली असून या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल ५५ कोटी २३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरूंद आणि धोकादायक ! तातडीने रुंदीकरण, डागडुजी करण्याची मागणी । Lohgad Fort
– मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली
– शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर


Previous Post

‘कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका – मुख्यमंत्री फडणवीस । PCMC

Next Post

महत्वाची बातमी ! लोणावळा शहर आणि मावळ ग्रामीण परिसरात वाहतुकीत मोठे बदल – पाहा पर्यायी मार्ग

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Major changes in traffic in Dehugaon area on occasion of Sant Tukaram Maharaj Bij ceremony

महत्वाची बातमी ! लोणावळा शहर आणि मावळ ग्रामीण परिसरात वाहतुकीत मोठे बदल - पाहा पर्यायी मार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.