दैनिक मावळ (प्रतिनिधी) : सत्य, संयम आणि मर्यादेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव अर्थात श्रीराम नवमी सोहळा मावळ तालुक्यातील धनगव्हाण गावात अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला. सालाबादप्रमाणे यंदाही गुरुवार (दि. २६ मार्च) रोजी धनगव्हाण येथे रामनवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच यंदा गावांतील युवकांच्या पुढाकाराने श्री राम मंदिरावर थ्रीडी नामफलक बसविण्यात आला असून यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीन भर पडली.
श्रीराम जन्मोत्सव आणि करंजूआई देवी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव
धनगव्हाण मावळ येथे पन्नास वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे. यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त महाराष्ट्रातील नामावंत प्रवचनकार व कीर्तनकार यांना ऐकण्याची संधी श्रोत्यांना लाभली आहे.
या सोहळ्यात सोमवार (दि.२३) रोजी हभप सुनील महाराज वरघडे (आर्डव) प्रवचण, तर हभप संजय महाराज कावळे (आळंदी) यांची कीर्तनसेवा झाली. मंगळवारी (दि.२४) हभप महादेव महाराज घारे (येलघोल) यांचे प्रवचन, तर हभप पांडुरंग महाराज शितोळे (शास्त्री) आळंदी यांची कीर्तनसेवा झाली. बुधवारी (दि.२५) हभप शंकर महाराज आडकर (शिवली) यांचे प्रवचन, तर हभप गणेश महाराज कार्ले (वैराग्य मुर्ती, पुणे) यांची कीर्तनसेवा झाली.
प्रत्यक्ष प्रभू श्रीरामनवमी उत्सव आणि करंजुआई देवीचा छबीना कार्यक्रमात; श्रीराम मंदिरात चैत्र शु. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, पहाटे ६ ते ७ श्री ची महापूजा व अभिषेक, सकाळी १० ते १२ वा हभप हरिदास महाराज पालवे ( शास्त्री ) ( रामायणचार्य आळंदी ) यांचे प्रभु श्रीराम जन्माचे काल्याचे किर्तन करण्यात आले व महाप्रसाद भंडारा ही करण्यात आला.
तसेच रामनवमी जन्मोत्सव सायंकाळी ४ ते ६ वाजता करंजूआई देवीचा छबिना पालखी, सांयकाळी ८ ते १० वाजता ढोल लेझीम तालांच्या गजरात यात्रा पार पडली. सर्व ग्रामस्थ मंडळी, श्रीराम तरुण मंडळ, श्रीराम ग्रुप व महिला भगिनी, युवापिढी, बालगोपाळांनी ह्या सोहळ्यात सक्रीय सहभाग घेत कुटुंब म्हणून सोहळा पार पाडला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक
– तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
– वृक्षमित्र म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मावळमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
– यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला