Dainik Maval News : राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे पोलीस आणि भरारी पथकांकडून जागोजागी वाहनांची तपासणी करुन बेहिशोबी रक्कम, मालमत्ता जप्त केली जात आहे. शुक्रवारी (दि.25) मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खालापूर टोलनाका येथे एका पिकअप टेम्पोमधून जवळपास आठ कोटीची चांदी खालापूर पोलीस आणि भरारी पथकाने जप्त केली आहे.
द्रुतगती मार्गावरुन एका वाहनातून मौल्यवान वस्तू चोरट्या पद्धतीने घेऊन जात असल्याची खबर खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकामार्फत खालापूर टोलनाक्यावर संशियत पिकअप टेम्पो (क्र. एमएच 01 इएम 8775) तपासणी केली असता, टेम्पोत 171 कुरिअर बॅगमध्ये लपवण्यात आलेली जवळपास 8 कोटी रुपयांची चांदी जप्त केली.
मावळात 17 लाख 75 हजारांची रोकड जप्त –
मावळ विधानसभा मतदार संघ क्षेत्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल 17 लाख 75 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक सुरू असून त्याअनुषंगाने लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, यामुळे मावळ विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.
मावळ येथील शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोल नाका परिसरात स्थिर सर्वेक्षण पथकाने सायंकाळी 5 वाजून 10 वाजता कारमधून 17 लाख 75 हजार रोकड जप्त केली. कारचालक पियुष जखोडीया (वय वर्ष 34) यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. मावळ येथील शिरगाव पोलिस ठाण्याचे हद्दीत उर्से टोलनाका येथे खोपोली कडून पुण्याला जात असलेल्या कारची तपासणी केली असता वाहन क्रमांक MH-12,UC-5535 मध्ये रोकड सापडली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात महायुतीत बंडखोरी ! सुनिल शेळके यांच्या विरोधात अनेक दिग्गज एकत्र । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यातील ताजे गावातील सख्ख्या भावांची शासकीय सेवेत निवड । Maval News
– राज्यात 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, विविध विभागांच्या पथकांची राज्यभर कारवाई