व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कोकण पर्यटनासाठी निघालेल्या ‘त्या’ सहाही युवकांवर काळाचा घाला ; ताम्हिणी घाटातील थार दुर्घटनेचा वृत्तांत आला समोर – वाचा

१८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ साडेबारा वाजेपर्यंत सर्वांचे फोन लागत होते. मात्र नंतर सर्वांचे फोन अचानक लागणे बंद झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 21, 2025
in पुणे, ग्रामीण, शहर
Six youths who were going for Konkan tourism died in a Thar accident at Tamhini Ghat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुण्यातील कोपरे उत्तमनगर येथे राहणारे सहा तरुण नवी कोरी थार गाडी घेऊन कोकणात पर्यटनासाठी निघाले होते. मात्र दिवेआगरला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. ज्यात या सहाही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तीन दिवसांच्या सहलीचे नियोजन करून वीस दिवसांपूर्वी खरेदी केलेली नवी कोरी थार गाडी घेऊन हे सर्वजण प्रवासाला निघाले. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे जाण्यासाठी निघाले होते. पुण्यातून ताम्हिणी घाट मार्गे माणगाव आणि माणगाव येथून दिवेआगरला पोहचणे अपेक्षित होते. मात्र ताम्हिणी घाटात सणसवाडी गावच्या हद्दीत एका तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी ५०० मीटर खोल दरीत जाऊन कोसळली. हा अपघात इतका भिषण होता की नव्या कोऱ्या थार गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि गाडीतील सर्वांचा जागीच मृत्यू झाला.

१८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ साडेबारा वाजेपर्यंत सर्वांचे फोन लागत होते. मात्र नंतर सर्वांचे फोन अचानक लागणे बंद झाले. त्यामुळे मुलांच्या नातेवाईकांना चिंता वाटू लागली. त्यामुळे १८ नोव्हेंबरला त्यांचे काही मित्र आणि नातलग मुलांचा शोध घेण्यासाठी दिवेआगरच्या दिशेने निघाले. त्यांनी संपूर्ण ताम्हिणी घाट पालथा घातला. दिवेआगर येथे जाऊन लॉजेस आणि हॉटेल्समध्ये जाऊन मुलांची विचारणा केली. मात्र सहाही जणांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी पुण्यातील उत्तमनगर पोलीस ठाण्यात जाऊन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पुणे पोलीसांनी या घटनेची वर्दी रायगड पोलिसांना दिली. त्यानंतर रायगड पोलीसांनी मुलांचा शोध सुरू केला.

अपघातग्रस्त गाडीतील मुलांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांचे लोकेशन ट्रेस केले गेले. यात ताम्हिणी घाटात सर्वांचे फोन लोकेशन शेवटचे ट्रेस झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने या परिसरात शोध मोहीम सुरू केली. गुरुवारी सकाळी अपघातग्रस्त वाहन सणसवाडी येथील दरीत साधारपणे पाचशे फूटावर झुडपात पडली असल्याचे आढळून आले. मात्र तोवर अपघातग्रस्त वाहनातील सहाही तरुण मुलांचा मृत्यू झाला होता. साहील बोठे, प्रथम चव्हाण, पुनित शेट्टी, ओंकार कोळी, शिवा माने आणि महादेव कोळी अशी मृत तरूणांची नावे आहेत.

गुरुवारी सकाळी अपघातग्रस्त वाहन सणसवाडी येथील दरीत साधारपणे पाचशे फूटावर झुडपात पडली असल्याचे आढळून आले. खोल दरीत ही दुर्घटना घडली असल्याने मृतदेह बाहेर काढणे हे पोलीस यंत्रणेसमोरील सर्वात मोठे आव्हान होते. त्यामुळे पुण्यातून रेस्क्यु चॅरीटेबल ट्रस्ट, माणगाव येथून शेलार मामा रेस्क्यू टीम, एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीम कोलाड आणि साळुंखे रेस्क्यु टीम महाड यांच्या पथकांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले. या पथकाने अथक प्रयत्न करून मृतदेह वर काढले. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी चार वाजता पूर्ण झाली. यानंतर सर्व अपघातग्रस्तांचे मृतदेह माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतक ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवृत्ती बोऱ्हाडे यांचे पथक या अपघाताचा पुढील तपास करत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana 


Previous Post

पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता वितरीत ; महाराष्ट्रातील ९० लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ८०८ कोटी २५ लाख थेट जमा

Next Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ : एकूण ४१ उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागे – पाहा संपूर्ण यादी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ : एकूण ४१ उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागे - पाहा संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.