Dainik Maval News : गुरुवारी (दि. ११) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेतेखाली मंत्रालयात संपन्न झालेल्या बैठकीनंतर लोणावळा ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत शुक्रवारी (दि. १२) पुणे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातही विशेष महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत लोणावळा ग्लास स्काय वॉक प्रकल्पासंदर्भातील विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या जागेचा तांत्रिक आढावा घेण्यात आला. विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित असलेल्या प्लॅननुसार जागांची पडताळणी करण्यात आली. पर्यायी कनेक्टिव्हिटी रस्त्यांची आखणी व त्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर विचार विनिमय करण्यात आला.
स्थानिकांना पर्यटनवाढीमुळे रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली. बैठकीदरम्यान पर्यटनक्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक उद्योजक व तरुणांना संधी देणे, तसेच दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी शासनस्तरावर आवश्यक प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पामधून स्थानिकांना रोजगार, व्यवसाय व उद्योगधंद्यांच्या संधी निर्माण होणार असून, याभागासोबतच पवना धरण परिसरातील गावांचाही विकास वेगाने होईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार सुनील शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ग्लास स्काय वॉक प्रकल्प :
लोणावळा जवळील कुरवंडे येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी प्रस्तावीत ग्लास स्काय वॉक प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसेच या प्रकल्पासाठी ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच ३३३ कोटी रुपयांची मान्यता मिळाली असून, पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मावळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प असल्याने मावळ तालुक्याच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न
– गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित