Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल मावळ महिला अध्यक्षा ज्योती राजिवडे यांच्या आयोजनाने, पवन मावळ विभागातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित केली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ महा. व्यवस्थापक नंदकुमार फुले हे होते. तसेच भाग्यश्री मोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी मावळ एस.डी. थोरात, नारायण ठाकर, आनंद बनसोडे, सुवर्णा राऊत, गणेश शेडगे, आर.एस. वाडेकर, सुनीता कालेकर, मोहीनी काळे, भरत राजिवडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोहळ यांनी केले. प्रस्तावना ज्योती राजिवडे यांनी केली. व्यासपीठावरील मान्यवरांनी आपल्या मनोगतात दिव्यांग बांधवांना ज्या शासकीय योजनेचा लाभ भेटत नाही त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
पवन मावळातील वाडी, वस्ती, खेडेगावातून जवळपास शंभराहून अधिक दिव्यांग नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होके. कार्यक्रमासाठी मनोज येवले, राकेश घारे, उत्तम घोटकूले, चंद्रकांत चांदेकर, रविंद्र वाडेकर, माऊली आढाव, दत्तात्रय कालेकर, प्रथमेश बनसोडे, निलेश घारे, मारुती काळे, नारायण भालेराव, रवी ठाकर उपस्थित होते. आभार सुवर्णा राऊत यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार