व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित बिझक्विन स्पर्धेला महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्री मनीलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने बिझक्वीन (सिझन-4) ही स्पर्धा महिला उद्योजकांसाठी आयोजित केली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 2, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Spontaneous response from women entrepreneurs to BizQuin competition organized by Skilletz Foundation

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्री मनीलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने बिझक्वीन (सिझन-4) ही स्पर्धा महिला उद्योजकांसाठी आयोजित केली होती. दिनांक २१ जानेवारी रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. स्किलेट्झ फाउंडेशन एक सामाजिक संस्था असून गेली चार वर्ष सातत्याने महिला उद्योजकांसाठी हा कार्यक्रम घेत आहे.

ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत खास महिला उद्योजीकांसाठी त्यांचा व्यवसाय, उत्पादने आणि सेवा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. कार्यक्रमाचे उद्घाटन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्मिताताई कुलकर्णी आणि एमएनबीटीआयच्या माधवीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी एक आधुनिक विषयाला घेऊन हा कार्यक्रम घेतला जातो, यंदा बिझक्वीन मधे शाश्वत विकासाच्या उद्दिष्टात सांगितले गेलेले, उत्पादन निर्मिती प्रक्रियेतील टाकाऊ घटकांचा पुनर्वापर करणे आणि त्याचे पुनर्निर्माण करणे ह्यावर भर देण्यात आला.

एकूण 60 महिला उद्योजिकांचा स्पर्धेत सहभाग
स्पर्धेच्या परीक्षक म्हणून ग्लॅमोन मिसेस इंडिया असलेल्या वर्षा शिंदे, सुगम संगीत रत्न मीरा मसे आणि इमेज कन्सल्टंट असलेल्या निकिता गोरडे लाभल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान रत्नाकर शेळके सरांच्या कलाकारांनी उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण केले. पुढील सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बरवा स्किन थेरपी च्या संस्थापिका कामाक्षी बर्वे आणि जुनो कंपनी च्या संस्थापिका डॉ. अर्पिता गोपाल उपस्थित होत्या.

पहिल्या फेरीनंतर 60 महिला उद्योजिकांच्या व्यवसायाच्या परिचय आणि सदरिकरणा नुसार पुढील फेरीसाठी टॉप 20 महिला उद्योजीकांची निवड करण्यात आली. दुसऱ्या फेरीत व्यवसाय आणि पुनर्निमित्ती संबंधी प्रश्न विचारून टॉप 9 जणींची निवड करण्यात आली. सहभागी झालेल्या प्रत्येक महिला उद्योजिकांपैकी प्रत्येकीला नाविन्यपूर्ण शीर्षकाने गौरवण्यात आले. विजेत्यांमध्ये नऊ जणींची निवड करण्यात आली.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जिंकलेल्या स्पर्धकांना त्यांच्या व्यवसायाच्या व्यवसायाच्या अनुभवानुसार नाव्या, उत्कार्षा आणि अद्विता हे शीर्षक देऊन गौरवण्यात आले. मावळ च्या शिवाई प्रतिष्ठान च्या अध्यक्षा मोनाली शंकर भेगडे यांना त्यांच्या समाजकार्यासाठी निर्मिती अवॉर्ड देऊन स्किलेट फाउंडेशने सन्मानित केले.

स्पर्धेसाठी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक भारतभूषण बराटे, हर्षदा भोसले, वासुदेव भोसले, रोहिणी वासुदेव भोसले, पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे राजीव पाटील, वडगाव नगरपंचायतीच्या नगरसेविका अर्चना म्हाळसकर, कार्ला-खडकाळा जिल्हा परिषदेच्या उमेदवार आशाताई वायकर, उद्योजिका रुपाली सातकर, नगरसेविका अर्चना कुडे, भाजपा महिला मोर्चा सचिव (मावळ) आरती भाळवणे आणि समाजसेविका ज्योती शिंदे या मान्यवरांनी सत्कार स्वीकारून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व उद्योजकांसाठी सकारात्मकता आणि आत्मविश्वास यावर स्किलेट्झ च्या स्वतः मिसेस युनिवर्स कॉन्फिडंट असलेल्या आणि जागतिक पातळीवर आणि जागतिक पातळीवर ग्रुमिंग चा अनुभव असलेल्या श्रुती पाटोळे क्लेरेन्स आणि कीर्ती भालेराव यांनी पूर्वतयारी करून घेतली होती. कार्यक्रमाचे नियोजन स्किलेट्झ फाउंडेशनच्या संस्थापिका सीए. सोनाली सरिपल्ली, डॉ. मिताली मोरे आणि श्रृती पाटोळे यांनी केले.

तर, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्मिता कुलकर्णी, माधवी शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पाटोळे यांनी केले. कार्यक्रमाला मिळालेल्या भरगोस यशामध्ये स्किलेट्झ फाउंडेशनची टीम राजश्री ताला, वनमाला चौधरी, भाग्यश्री पुणेकर आणि प्रीती खाडे यांचे महत्त्वाचा वाटा आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो


Previous Post

इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे यांना मतदारांचा वाढता पाठींबा

Next Post

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Marathi Language Conservation Fortnight celebrated at Savitribai Phule Women College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ram Navami celebrations in full swing in Dhangavhan village of Maval

मावळातील धनगव्हाण गावात श्रीराम नवमी सोहळा उत्साहात ; प्रभू श्रीराम जन्मोत्सव व करंजूआई देवी उत्सव निमित्त हरिनाम सप्ताह संपन्न

March 27, 2026
Shri Ram Navami festival celebrated in traditional manner at Tikona Fort Maval

Ram Navami At Tikona Fort : किल्ले तिकोणा गडावर पारंपारिक पद्धतीने श्री रामनवमी उत्सव साजरा

March 27, 2026
storm rages in Lonavala for one rupee Petrol pump office vandalized employees beaten up Case registered

लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल

March 27, 2026
BJP Subhash Jadhav elected as chairman of Maval Taluka Agricultural Produce Market Committee NCP shocked

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! संख्याबळ असूनही बाजार समितीच्या सभापती पदी भाजपच्या सदस्याची बहुमताने निवड

March 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

द्रुतगती मार्गावरील ३० तासांच्या वाहतूक कोंडीची समितीकडून चौकशी सुरू ; मुंबई-पुणे मिसिंग लिंक मे महिन्यात खुला करण्याचे नियोजन

March 26, 2026
CM and both Deputy Chief Ministers distributed eighth installment of Shetkari Mahasamman Nidhi Yojana

शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण

March 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.