Dainik Maval News : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मावळ तालुक्यातील पोल्ट्री शेडचे नोंदणी अभियान वेगाने सुरू असून आत्तापर्यंत ४५० पोल्ट्री शेडच्या नोंदी पूर्ण झाल्या असल्याचे मावळ तालुका पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी सांगितले.
राज्य शासनाने पोल्ट्री व्यवसायाला कृषीचा दर्जा दिलेला असून राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांच्या नोंदणी अभियानानुसार मावळ तालुक्यात पोल्ट्री शेडचे नोंदणी अभियान मावळ तालुका पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ अनिल परांडवाल आणि डॉ दीपक राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सुरू आहे.
मावळ तालुक्यात सुमारे वीस वर्षांपूर्वीपासून शेतीला जोडधंदा म्हणून सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अर्थसहाय्यावर मावळ तालुक्यात या व्यवसायाला सुरुवात केली. हा व्यवसाय सध्या मावळ तालुक्यामध्ये शेतीनंतर एक पूरक व्यवसाय म्हणून समजला जातो.
मावळ तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत हे अभियान सध्या सुरू असून गाव पातळीवर असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत ही नोंदणी केली जात आहे. पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपापल्या पोल्ट्रीची नोंद करून घ्यावी, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे व पशु संवर्धन विभागाचे डॉ अनिल परांडवाल व डॉ दीपक राक्षे यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न