राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने गोपनीय माहिती मिळाल्यानुसार म्हाळुंगे गावाच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात गावठी दारुसह सोनेरी रंगाची सॅन्ट्रो कार असा २ लाख ६८ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या छाप्यात अंदाजे २ लाख २५ हजार रुपयांच्या सॅन्ट्रो कारमध्ये ३५ लीटर क्षमतेच्या १२ प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे ४३ हजार २०० रुपये किंमतीची दारु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामधील फरार आरोपीचा शोध सूरू असून आरोपी विरूद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए)(ई) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ( State Excise Department raided an illegal liquor outlet in Mhalunge Pune Crime News )
निरीक्षक सचिन श्रीवास्तव पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई डी विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशी, शीतल देशमुख, सागर ध्रुवे जवान संजय गोरे, राजू पोटे, शुभम मुंढे व वाहन चालक राऊत यांच्या पथकाने पार पाडली.
अधिक वाचा –
– खबरदार ! ‘डीप फेक’ फोटो, व्हिडिओ बनवाल किंवा प्रसारित कराल तर होईल कडक सजा, पोलिसांना मिळालेत थेट आदेश
– कार्ला येथे मतदान ओळखपत्र चिठ्ठी वाटप सुरु, लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे मतदारांना आव्हान । Maval Lok Sabha
– अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ संपन्न । Maval Lok Sabha