Dainik Maval News : कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या इच्छुक उमेदवार आशाताई बाबुराव आप्पा वायकर यांचा सध्या गटातील गावांमध्ये गावभेट दौरा सुरू आहे. बुधवार, दिनांक 19 नोव्हेंबर रोजी आई एकवीरा देवी पायथ्यापासून त्यांच्या या गावभेट दौऱ्याची सुरुवात झाली. आशाताई वायकर यांच्या या गावभेट दौऱ्याला कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
बुधवारी, दि. 19 नोव्हेंबर रोजी पहिल्याच दिवशी राजमाची, कुणेगाव, ठाकरवाडी, पांगळोली, वरसोली या गावांमध्ये आशाताई वायकर यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. यावेळी आशाताई वायकर यांच्यासोबत भाजपाच्या कार्ला पंचायत समिती गणातील उमेदवार रंजना सुरेश गायकवाड याही उपस्थित होत्या.
गावभेट दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका वाकसई वरसोली, ठाकरवाडी या गावांमध्ये आशाताई वायकर यांनी भेट दिली. याप्रसंगी गावकऱ्यांनी आशाताई वायकर यांचे स्वागत करीत त्यांना आपला पाठिंबा दर्शविला.
शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी कार्ला खडकाळा गटातील डोंगरगाव, केवरे वसाहत, डोंगरगाववाडी आणि सदापूर या गावांमध्ये आशाताई वायकर यांनी गावभेट दौरा संवाद दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी गावातील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेत त्या दूर करण्यासाठीचा आश्वासक शब्द त्यांना दिला. ग्रामस्थांनी देखील येत्या निवडणुकीत आशाताई वायकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.
रविवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी हॅबीटेट, बोरज, पाटण, मळवली या गावांमध्ये आशाताई वायकर यांच्यासोबत रंजनाताई गायकवाड यांचा गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. या सर्व गावकऱ्यांनी भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. सोमवार ( दि. 24 ) रोजी आशाताई वायकर यांनी मळवली, टाकवे, फांगणे या गावातील ग्रामस्थांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत आपुलकीचा संवाद साधला.
येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून मावळमधील कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटातून आशाताई बाबुराव आप्पा वायकर या एक सक्षम आणि प्रभावी उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून इच्छुक आहेत. त्यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कार्ला खडकाळा गटातून आशाताई वायकर यांना उमेदवारीसाठी सकारात्मक प्रतिसाद मतदारातून मिळताना दिसतोय.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
