Dainik Maval News : बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा मावळ तालुक्यात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. वडगाव मावळ येथे गुरुवारी महाविकास आघाडीच्या वतीने यासाठी भव्य निषेध मोर्चा तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला होता. आंदोलकांनी पोटोबा महाराज मंदिर ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढून तहसीलदार विक्रम देशमुख यांना निषेध नोंदविणारे पत्र आणि मागण्याचे निवेदन सादर केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काही दिवसांपूर्वीच कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची गंभीर घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता महाराष्ट्रात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली. बदलापूर येथे एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर एका २४ वर्षी सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. लहानग्या मुलींनी आपल्या पालकांना याबाबत सांगितल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यापार्श्वभूमीवर मविआच्या वतीने वडगाव येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.
नराधमांना फाशी द्या, चिमुकल्यांना न्याय द्या… अशी घोषणा यावेळी मोर्चात करण्यात आल्या. लहान मुलीवरील बदलापूर अत्याचार घटना व महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यात हे महायुती सरकार व गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरलेले असून सुसंस्कृत महाराष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख पुसून महाराष्ट्र युपी-बिहार च्या दिशेने वाटचाल करीत आहे, असा घणाघात यावेळी करण्यात आला.
राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नराधमांना कायदा सुव्यवस्थेचा मुळीच धाक राहिलेला नाही. सत्ताधारी कितीही लाडकी बहीण योजनेची जाहिरात करीत असले तरी आज महाराष्ट्रातील मुली, महिला, बहिणी सुरक्षीत नाहीत. या अन्यायाविरुद्ध आवाज ऊठवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना आंदोलनाद्वारे मांडून राज्य सरकार विरुद्ध निषेध व्यक्त करत महाराष्ट्रात राज्यात घडत असलेल्या विकृतीला ठेचण्यासाठी मावळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध व्यक्त करत नराधमांना फाशी द्या, चिमुकल्यांना न्याय द्या व हि केस फास्ट ट्रॅक वर चालावी अशा मागणीचे निवेदन मावळचे तहसिलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले. ( Strong protest by people of Maval against Badlapur atrocities protest march at Vadgaon Maval and statement to Tehsildar )
– गृहमंत्र्यांचे लक्ष सत्तेवर कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर..
– न्याय द्या न्याय द्या..लाडक्या बहिणीला न्याय द्या..
– सुरक्षा द्या.. सुरक्षा द्या..बहिणीच्या लेकीला सुरक्षा द्या..
– नराधमांना फाशी झालीच पाहिजे
अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
निवेदनात काय म्हटलंय?
बदलापूर अत्याचार घटना व महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यात हे महायुती सरकार व गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरलेले असून सुसंस्कृत महाराष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख पुसून महाराष्ट्र युपी-बिहार च्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नराधमांना कायदा सुव्यवस्थेचा मुळीच धाक राहिलेला नाही. सत्ताधारी कितीही लाडकी बहीण योजनेची जाहिरात करीत असले तरी आज महाराष्ट्रातील मुली, महिला, बहिणी सुरक्षीत नाहीत.या अन्यायाविरुद्ध आवाज ऊठवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना आंदोलनाद्वारे मांडून राज्य सरकार विरुद्ध निषेध व्यक्त करत महाराष्ट्रात राज्यात घडत असलेल्या विकृतीला ठेचण्यासाठी मावळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध व्यक्त करत नराधमांना फाशी द्या, चिमुकल्यांना न्याय द्या व हि केस फास्ट ट्रॅक वर चालावी अशा मागणीचे निवेदन मावळचे तहसिलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी अतुल राऊत, दत्तात्रय पडवळ, यशवंत मोहोळ, आशिष ठोंबरे, विशाल वहिले, राजेश वाघोले, उमेश गावडे, भारत ठाकूर, मंगेशकाका ढोरे, जयश्रीताई पवार, शैलाताई खंडागळे, रत्नमालाताई करंडे, शादानभाभी चौधरी, पुजाताई वहिले, आरतीताई राऊत, नीलमताई घाडगे, संगीताताई सोनवणे, पुष्पाताई भोकसे, रूपालीताई क्षिरसागर, रंजनाताई कदम, शोभाताई साठे, सईंद्राताई सातपुते, बॉबीताई डीक्का, जयश्रीताई मदगे, वैशालीताई फाटक, सईंताई मोधळे, रोहिदास वाळुंज, बाळासाहेब शिंदे, नंदकुमार कोतुळकर, शंकर भेगडे, मदन शेडगे, सोमनाथ धोंगडे, आफताब सय्यद, राजेश बाफना, बारकू दोरे, सोमनाथ कोंडे, महादू खांदवे, अनिस तांबोळी, राहील तांबोळी, संदीप शिंदे, नामदेव पानसरे;
विशाल वाळुंज, सुनील चव्हाण, शांताराम नरवडे, माऊली काळोखे, राजू फलके, दामोदर मराठे, अमित घेनंद, बाळासाहेब फाटक, सुरेश गुप्ता, भरत भोते, राजू मोरे, राहुल नखाते, मारुती खोले, अक्षय साबळे, सागर गायकवाड, बाळासाहेब चव्हाण, कौस्तुभ ढमाले, सहादू आरडे, प्रतापराव हुंडेकरी, सतीश इंगवले, नवनाथ राणे, लक्ष्मण आखाडे, सिध्दनाथ नलावडे, सतीश शेलार, रवींद्र चव्हाण, सतीश गरुड, संतोष शिंदे, युवराज सुतार, कचरू गराडे, गोरख देवकाते, राहुल दवणे, दामोदर मराठे, अनिल खांदवे, दत्तात्रय गवारे, संदीप खाणेकर, बाळासाहेब पारीठे, संजय घाडगे, शांताराम दहिभाते, सचिन ढोरे, अजय भोसले, हनुमंत मोधळे, प्रशांत भालेकर, शाळकरी भगिनी आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वाघेश्वर गावचे सुपूत्र देविदास कडू यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार । Maval News
– तळेगाव नगरपरिषदेचे अधिकारी – कर्मचारी जाणार संपावर, जाणून घ्या कारण… । Talegaon Dabhade
– गृह विभागाकडून महिलांच्या सुरक्षेकरिता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी ; वाचा सविस्तर