Dainik Maval News : मावळ तालुक्यात खरीप हंगाम महत्वाचा असून येथील भात पीक प्रमुख असल्याने उपविभागीय कृषी अधिकारी सुनील जाधव यांनी मावळ तालुक्यातील सांगवडे, माळवाडी, कातवी गावांना भेट देऊन खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला, सोबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सांगवडे येथे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत औजार यंत्र ट्रॅक्टरची मोका तपासणी केली. सध्या कृषी विभागामार्फत खरीप हंगामातील मोहिमा राबविण्याचे काम चालू आहे, त्याअंतर्गत सांगवडे येथे “पाणी फाऊंडेशन डिजिटल शेतीशाळा” मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना लॅपटॉपद्वारे भात पिकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
उपविभागीय कृषी अधिकारी जाधव यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना, एग्रीस्टॅक योजना, मग्रारोहयो योजना आदींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्याप बनविणे बाकी आहे, त्यांनी तात्काळ फार्मर आयडी काढून घेण्याबाबत सांगितले.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, मंडळ कृषी अधिकारी नागनाथ शिंदे , उपकृषी अधिकारी विकास गोसावी, सरपंच रोहन जगताप, ग्रामपंचायत अधिकारी रोहिणी खामकर, नागेश हेमबाडे व शेतकरी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढविण्यासाठी भात लागवड चारसूत्री, एस. आर.टी. पद्धतीने करावी. कृषि विभागाच्या विविध योजनाचा फायदा घ्यावा, असे आवाहन सुनील जाधव यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime