Dainik Maval News : मावळ तालुक्यात ॲग्रीस्टॅक योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनविण्याचे काम वेगात सुरू आहे. मावळमधील सर्व ग्रामपंचायतींमध्ये महसूल, ग्रामविकास, कृषि विभाग यांच्यामार्फत शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बनविण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे.
दरम्यान ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये मावळ तालुक्यातील कामाची तपासणी करण्यासाठी उपविभागीय कृषि अधिकारी सुनील जाधव हे मौजे साळुंब्रे गावात आले होते. यावेळी ग्राममहसूल अधिकारी राहुल आरडक यांनी साळुंब्रेतील शेतकरी अमोल विष्णू सोरटे यांचे फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करून दाखविले.
उपविभागीय कृषि अधिकारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक योजनेचे फायदे सांगून मार्गदर्शन केले. गावातील सर्व शेतकऱ्याचे फार्मर आयडी बनवून घेण्याच्या सूचना कृषिसहायक व ग्राममहसूल अधिकारी यांना दिल्या. यावेळी कृषि अधिकारी सूर्यकांत कुंभार, मंडळ कृषि अधिकारी प्रशांत डहाळे, कृषि पर्यवेक्षक नरेंद्र मेंगडे, कृषि सहाय विकास गोसावीक, ग्राममहसूल अधिकारी राहुल आरडक व शेतकरी उपस्थित होते.
ॲग्रीस्टॅक ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या दुरुष्टीने व शेतीच्या भविष्यासाठी महत्वाची व फायदेशीर आहे. तरी मावळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ अग्रीस्टॅक योजने अंतर्गत फार्मर आयडी बनवून घ्यावेत. – सुनील जाधव, उपविभागीय कृषि अधिकारी, पुणे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime