रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. वाघमारे यांच्या निवडीबद्दल लोणावळा शहरातील विविध पक्ष, संघटना व सर्वपक्षीय जागरूक नागरिकांच्या वतीने सूर्यकांत वाघमारे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष विलास बडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नासिर शेख, शिवसेना उबाठा पक्षाचे शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे, काँग्रेसचे माजी तालुका कार्याध्यक्ष डॉ. किरण गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, भरत हरपुडे, माजी नगरसेवक संजय गायकवाड, जितेंद्र कल्याणजी, उमेश तारे, ज्ञानेश्वर येवले, सनी पाळेकर, संजय अडसूळे, भरत भरणे आदी यावेळी उपस्थित होते. ( Suryakant Waghmare Leader Of RPI Athawale Group Appointed As Member of Pune District Planning Committee )
अधिक वाचा –
– विशेष बातमी! …अन् मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी बदलली
– महत्वाची अपडेट! तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार । Talegaon Dabhade
– भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना तिकीट; पंकजा मुंडे, मुनगंटीवार यांनाही उमेदवारी