Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील भेगडेआळी येथे असणाऱ्या कानिफनाथ महाराज मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता भाविक भक्तांनी स्वच्छेने, सढळ हाताने मदत करावी. पैसे किंवा वस्तू स्वरूपात वीट, सिमेंट, वाळू, स्टील इत्यादी बांधकाम साहित्य तसेच स्वरूपात मदत करावी, असे आवाहन कानिफनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार समितीमे केले आहे.
तळेगाव गाव भागातील कानिफनाथ महाराज मंदिर हे जागृत देवस्थान असून अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. या मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडत असतात. सध्याचे मंदिर हे याकरिता लहान पडत असून त्याचा जिर्णोद्धार होणे आवश्यक होते, त्यानुसार मंदिर निर्माणाचे काम हाती घेण्यातत आले आहे.
तळेगाव शहर व अन्य भागातील भाविक भक्तांनी बांधकाम साहित्य अथवा देणगी स्वरूपात मदत करावी, तसेच अधिक माहिती करीता मारुती दत्तोबा सातकर ( ९८२२३७११५७ ) संतोष किसनराव भेगडे ( ९८२३७७७७५५ ) कैलास रामचंद्र भेगडे ( ८७९६९५०९४५ ) अजय नथुराम भेगडे ( ९८२३१३७७० ) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाबाबत पीएमआरडीए कार्यालयात विशेष आढावा बैठक संपन्न
– मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार । Maratha Reservation
– आनंदाची बातमी ! ‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू ; सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची संधी