Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. निवडणुक कार्यक्रमपत्रिकेनुसार छाननी प्रक्रिया पूर्ण होऊन आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उद्या दुपारी तीन पर्यंतचा कालावधी उरला आहे.
तळेगाव दाभाडे शहरात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने युती करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले असून तशी पाऊल दोन्ही पक्षांनी टाकत जागा वाटप करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
परंतु निवडणुकीच्या अतिशय शेवटच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस शिल्लक असताना झालेली ही युती दोन्ही पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांना मान्य आहे, असे दिसत नाही. यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करताना शेवटच्या दोन दिवसांत मोठी बंडखोरी होऊन दोन्ही पक्षातील मोठ्या संख्येने बंडखोर उमेदवार समोर आले.
छाननी नंतरही अर्ज बाद होऊन देखील मोठ्या संख्येने बंडखोर उमेदवार अजूनही रिंगणात असल्याचे दिसते. अशात उद्या ( दि. 21 ) दुपारी तीन पर्यंत बंडखोरांचे बंड न शमल्यास दोन्ही पक्षाने युती म्हणून मांडलेली गणिते बिघडण्याची शक्यता वर्तविली जात असून यामुळे सद्यस्थिती या पक्षांची युती संकटात असल्याचे चित्र दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana
