Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विभागनिहाय मतदार याद्यांवर एकूण १,८९१ हरकती दाखल झाल्या आहेत. यापैकी ९२२ हरकतींसाठी पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रनिहाय तपासणी करून अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सनसाईक यांनी दिली.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती व आक्षेप नोंदविण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत होती. या काळात या हरकती प्राप्त झाल्या. प्रशासकीय पडताळणीनंतर पुरावे नसलेल्या हरकतींसाठी संबंधित भागात प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात एकूण १४ प्रभाग असून २८ नगरसेवक निवडले जाणार आहेत.
प्रभागनिहाय हरकतींचा तपशील : प्रभाग – प्राप्त हरकती – पुरावे नसलेल्या हरकती
प्रभाग क्र. १ ( ५७-२९ ), प्रभाग क्र. २ ( १०४-६४ ), प्रभाग क्र. ३ ( १७९-१४५ ), प्रभाग क्र. ४ ( ६६-३४ ), प्रभाग क्र.५ ( ४५ – २२ ), प्रभाग क्र. ६ ( २३० – ८० ), प्रभाग क्र. ७ ( २११-१५ ), प्रभाग क्र. ८ ( ७७-३४ ) प्रभाग क्र.९ ( १२९-४५) प्रभाग क्र.१० ( ९३ – ५८ ) प्रभाग क्र.११ ( ३३४-१५४) प्रभाग क्र. १२ ( २०२ – १५९ ), प्रभाग क्र.१३ ( ८०-३३ ), प्रभाग क्र.१४ ( ८४ – ५० )
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर
