Dainik Maval News : इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, (आय.एस.टी.ई.) नवी दिल्ली यांच्या मार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र-गोवा विभागातून बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट – २०२५ (पदवी स्तर) चा पुरस्कार पुणे, तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी यांना आय.एस.टी.ई. चे अध्यक्ष, डॉ. प्रतापसिंह देसाई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, डीटीईचे सह-संचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.
तसेच नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी मधील प्राध्यापक डॉ. नितीन अजाबराव धवस यांना बेस्ट टीचर (पदवी स्तर) पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी सीओईपी टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एस. जी. भिरुड, अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. जैन, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, डीटीईचे सह-संचालक डॉ. डी. व्ही. जाधव, आय.एस.टी.ई. महाराष्ट्र व गोवा विभागाचे चेअरमन डॉ. रणजीत सावंत, केजे एज्युकेशन ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका, सौ. हर्षदा जाधव तसेच केजे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत आदी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पदवी अभियांत्रिकी क्षेत्रातील एकाच वेळी दोन पुरस्कार मिळविणारे महाविद्यालय म्हणून आम्हाला अभिमान असल्याचे आणि दुहेरी सन्मानामुळे महाविद्यालयाचे गुणवत्तापूर्ण अध्यापन, शैक्षणिक नेतृत्व व संस्थात्मक प्रगती यातील उत्कृष्टता अधोरेखित झाली असल्याचे, सत्काराला उत्तर देताना महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संचालक डॉ. प्रमोद पाटील (अधिष्ठाता, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य/संचालक डॉ. प्रमोद पाटील, रजिस्ट्रार श्री. विजय शिर्के, डीन डॉ. नितीन धवस, डॉ. सागर शिंदे, विभाग प्रमुख डॉ. सागर जोशी, डॉ. सौरभ सावजी, डॉ. राहुल पाटील आदींनी पुरस्कार स्वीकारला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
