Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथे एका घरातून तब्बल ३० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई तळेगाव दाभाडे शहरातील एसटी स्टँडजवळ मंगळवारी (दि. २४ जून) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पियुष आनंद अगरवाल (वय २५, रा. तळेगाव, पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस शिपाई संदीप गंगावणे (वय ३२) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ३० हजार २०४ रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थाचा (गुटखा) साठा बेकायदेशीररित्या करून ठेवला होता. तळेगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील सांगवडे, गहुंजे या दोन गावांसह ‘ही’ सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत घेण्याची मागणी
– तिसरी भाषा शिकण्याची सक्ती नाही; मराठी भाषा अनिवार्य, तर हिंदीसह इतर भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
– राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजेच्या दरात होणार मोठी कपात ; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
– Lonavala : गर्दीचा फायदा घेत दुकानदारांची फसवणूक, लोणावळ्यात खोट्या यूपीआय पेमेंटचा पर्दाफाश, पोलिसांचे आवाहन…