मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील सर्वसामान्य नागरिक आजही काही प्रमाणात महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन मंडळाची बस सेवा म्हणजेच एसटी बस सेवेवर अवलंबून आहेत. परंतू असे असतानाही डोंगर टेकड्यांचा भाग असलेल्या पवन मावळ भागात परिवहन मंडळाच्या तळेगाव आगारातून ‘सेवेला पूर्ण विराम देण्याच्या अवस्थेत’ असलेल्या बसेस पाठवल्या जातात, आणि त्यातूनच मग अर्ध्या प्रवासात या बसेस कधी कधी दम टाकतात. ( talegaon depo st bus brake failure at javan ghat pavan maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बहुदा अशीच एक दुरुस्तीच्या टप्प्यात आलेली बस मंगळवारी (दिनांत 18 एप्रिल) तळेगाव आगारातून मोरवे गावाकडे (पवनमावळ) रवाना झाली असावी. याचे कारण सायंकाळी अंधार पडायची वेळ झालेली असताना आणि बसमधील काहीएक प्रवासी घराच्या ओढीने लालपरीतून प्रवास करत असताना जवण गावच्या घाटात या बसचा ( एम.एच. 07 सी 7284 ) ब्रेक फेल झाला आणि बस कंट्रोलचा थरार प्रवाशांनी अनुभवला. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानाने एसटीचा हँडब्रेक मारुन चालकाकडून बस कंट्रोल करण्यात आली. मात्र तोवर प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला होता.
त्यानंतर तब्बल तासादीडतासाने आगारातून दुसरी बस आली आणि प्रवासी पुन्हा मार्गस्थ झाले. मात्र तोपर्यंत या सर्व प्रवाशांना अंधारात तसेच तिष्ठत बसावे लागले. मुळातच राज्यात जिथे लालपरीच्या महसूल कमी होत असतानाचे चित्र दिसत आहे, तिथे जी लोकं लालपरीवर अवलंबून आहेत, त्यांना तरी चांगली सेवा मिळावी, यासाठी परिवहन मंडळाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. ( talegaon depo st bus brake failure at javan ghat pavan maval ) ( माहिती स्त्रोत – रामदास वाडेकर, हनुमंत गोणते, किसन बीडकर)
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ओझर्डे, कांब्रे आणि साते गावातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी मदत
– अनधिकृत होर्डिंगकडे महापालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – खासदार श्रीरंग बारणे