Dainik Maval News : तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आंबी येथे एका गावठी दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये 900 लीटर रसायन आणि 30 लीटर तयार दारू असा एकूण 9 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
बुधवारी (दि.२९) सायंकाळी पाऊणे चारच्या सुमारास आंबी (ता.मावळ) येथे ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस शिपाई रमेश सोमीनाथ घुले (वय 26, नेमणुक तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार 32 वर्षीय महिला आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ख) (च) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बेकायदेशीरपणे दारूभट्टी लावली होती. त्यामध्ये 900 लिटर दारू तयार करण्यासाठी रसायन भिजत घातले होते. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात भूकंप ! विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंविरोधात प्रचार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन
– पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी
– वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन