तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत ( Talegaon Municipal Council Building ) नव्याने बांधण्यात येत आहे. त्यासाठी जुणी इमारत म्हणजेच डॉ हेगडेवार भवन ( Dr Hegdewar Bhavan ) भुमिपूजनासाठी पावसाळ्यापुर्वीच पाडण्यात आले. मात्र, पावसाळा सुरु झाल्याने अद्याप कोणतेही बांधकाम झालेले नाही. तसेच, या सर्व प्रकाराने यंदाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देखील तळेगाव पालिकेत साजरा होऊ शकला नाही. या सर्व परिस्थितीवर जनसेवा समिती ( Jan Seva Samiti ) संस्थापक किशोर आवारे ( Kishore Aware ) यांनी रोखठोक पोस्ट लिहिली आहे.
किशोर आवारे यांची रोखठोक सोशल पोस्ट वाचा जशीच्या तशी…
“आपल्या तळेगाव नगरपरिषदेचा भूमिपूजन समारंभ 3 जून 2022 रोजी संपन्न झाला. सदर भूमिपूजन सोहळा दैदिप्यमान स्वरूपात साजरा करण्यात आला. शहरात खूप मोठ्या प्रमाणात झेंडे लावण्यात आले युद्धपातळीवर तीन दिवसात डॉ. हेडगेवार भवन जमीनदोस्त करण्याचा घाट कशासाठी घातला… पण का?
जर आपल्याला माहीतच होते कि पावसाळ्या नंतरच नगरपरिषदेच्या इमारतीचे काम सुरू होणारं होते आणि कोणतीही तांत्रिक मंजुरी नसतानाही पालिका पाडण्याचा बालहट्ट कोणी धरला? आपन राबवलेल्या कार्यक्रमामुळे तळेगावच्या इतिहासात प्रथमच स्वातंत्र्याचा महोत्सव तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत साजरा करण्यात आला नाही.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला निष्ठुर राजकारण्यांनी दिलेली बगल इतिहास कदापि विसरणार नाही. डॉ. हेडगेवार भवनावरती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा झेंडा न फडकवणे म्हणजेच नाकारते पणाचे लक्षण आहे ही तर सत्तेची मग्रूरीच म्हणावी लागेल. तळेगाव दाभाडे डॉ. हेडगेवार भवन इमारतीवर तुमच्या कुठल्याही पक्षाच्या झेंड्यापेक्षा देशाचा झेंडा महत्वाचा नव्हता का? स्वतःला प्रश्न विचारा कदाचित कडवट राष्ट्रभक्तीच्या बाता मारून राष्ट्रवाद जन्माला येत नाही त्यासाठी कृती हवीच…
तुमच्या कोणाच्यातरी पत्रावरून मिळणारे तालुकाध्यक्ष पद किंवा लोकांनी पत्रावळींसारखे वाढलेले लोकप्रतिनिधी पद हे आज नाही उद्या कोणीतरी हिसकाऊन घेणारच आहे. तसंही त्याला काय किंमत आहे हे साऱ्या जनतेला ठाऊक आहे… पंरतू भारतीय म्हणून आपली असणारी ओळख कधीही लपणार नाही.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आपण कितीही झेंडे बदलले तरीही तिरंगा हा आपणही कधीही विसरु शकनार नाही. भारतीय असणं हा अभिमान आहे कुठल्या पक्षाची लाचारी नव्हे… संपूर्ण तळेगाव शहरात “हर घर तिरंगा” हे अभियान राबवून देशाचे झेंडे सर्वत्र फडकवले जात होते परंतु नगर परिषदेवर शासकिय कार्यक्रमाचे आयोजन न होणे याहुन वाईट या आधी कधीही तळेगावकर नागरिकांनी घडलेलं बघितलं नसेल…
नक्की ते भूमिपूजन होते कि जमीनदोस्त झालेल्या इमारीच्या ढिगार्याचे पूजन होते ह्याचा अर्थ अजून तरी लागलेला नाही आणि हो हे लक्षात असु द्या वैचारिक तळेगावकरांच्या बुद्धीला लागलेली कीड ज्या दिवशी निघेल त्या दिवशी तुम्ही कुठलाही झेंडा वापरा दांडा बाकी लोकांचा असेल. जय हिंद!” ( Talegaon Municipal Council Building Dr Hegdewar Bhavan Janseva Samiti Kishore Aware Facebook Post )
अधिक वाचा –
तळेगाव नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामाची आमदार शेळकेंकडून पाहणी
आमदार शेळकेंच्या प्रयत्नांमुळे मावळकरांचे स्वप्न होणार पुर्ण; तालुक्यात लवकरच ‘ही’ यंत्रणा उभारणार