Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि जागृती फॉर एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील नामांकित, तज्ञ मार्गदर्शकांचे मोफत मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत.
सदर उपक्रमाची सुरूवात मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून या कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याधिकारी ममता राठोड ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुनील कामठाण, संदीप सिंग, वृषालीराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे उपस्थित होते.
मागील दोन वर्षात नगरपरिषदेने सुरु केलेल्या अभ्यासिकेतील २५ विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील सरकारी नोकरीत निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या संख्येत वाढ होऊ शकते, म्हणून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे नियोजन नगरपरिषदेचे अधिकारी सिद्धेश्वर महाजन आणि जागृती फॉर एक्सलन्सचे संस्थापक विद्याभूषण यांनी केले. नगरपरिषदेचे अधिकारी कल्याणी लाडे, मोनिका झरेकर, गौरी चव्हाण, विभा वाणी, मयुरी आढोळे, शीतल कडूसकर, चंद्रशेखर खंते, रुपेश देशमुख आणि अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

