Dainik Maval News : लोणावळा शहर पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी (दि.१५) पहाटे जुना पुणे – मुंबई महामार्गावर एल अँड टी कंपनीसमोर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला, यात दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून सातजण जखमी झाले आहेत.
फिर्यादी अनिस अब्बास पटेल (वय ५३, रा. सिंहगड रोड, पुणे) हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर (एमएच १४ एलबी १७५९) कारमधून मुंबईहून पुण्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या इर्टिगा कारच्या चालकाने बेदरकारपणे ओव्हरटेक करत स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या टाटा नेक्सॉन (एमएच ४६ बीझेड ३३६२) कारलाही धडक बसली.
अपघातात इर्टिगा कारमधील आमिना साजीद मालदार (वय १०) हिला डोके व तोंडाला गंभीर दुखापत होऊन, तिचा मृत्यू झाला. तर फिर्यादी अनिस पटेल यांच्यासह संकेत कोळेकर, आकाश कांगणे (दोघे रा. पनवेल, जि. रायगड), इर्टिगा कारमधील जैनुद्दीन हुसेमिया मालदार, रिहाना जैनुद्दीन मालदार, फारिया साजीद मालदार आणि चालक साजिद जैनुद्दीन मालदार (वय ४२, सर्व रा. खालापूर, जि. रायगड) हे जखमी झाले आहेत. काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. इर्टिगा चालक साजिद मालदार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही अन्….
दरम्यान लोणावळा शहरापासून हाकेच्या अंतरावर मध्यरात्री तीन कारचा भीषण अपघात झाला. मात्र, जखमींचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ‘गोल्डन अवर मध्ये १०८ रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल ३५ मिनिटे संपर्क साधूनही रुग्णवाहिका न आल्याने जखमी रक्तबंबाळ अवस्थेत ताटकळत राहिले. अखेर स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे यांच्याशी संपर्क साधला. रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलिसांच्या वाहनांतूनच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक
