Dainik Maval News : नागरिकांची मागणी आणि मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने बेबडओव्होळ ते निगडी पीएमपीएमएल बसला शनिवारपासून सुरुवात झाली. खासदार बारणे यांनी बसला हिरवा झेंडा दाखविला. बस सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
बेबडओव्होळ येथे बेबडओव्होळ ते निगडी पीएमपीएमएल बससेवेचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी डेपो मॅनेजर अशोक साबळे, बस चेकर श्रीहरी ढाकणे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक ह.भ. प. छबन महाराज कडू, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, उपतालुका प्रमुख राम सावंत, चंद्रकांत भोते, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, युवासेना तालुका प्रमुख राजेश वाघोले,
बेबडओव्होळच्या सरपंच तेजलताई घारे, उपसरपंच ज्योतीताई घारे, त्र्यंबक घारे, नथुराम झांबरे, संदीप ढमाले, भरत घारे, श्रीकांत जाधव, नवनाथ हरपुडे, प्रवीण ढोरे, दिपक घारे, मदन शेडगे व मोठ्या संख्येने ग्रामस्त उपस्थित होते.
बेबडओव्होळ मधील ग्रामस्थांची अनेक वर्षांची बेबडओव्होळ ते निगडी पीएमपीएमएल बस सेवा सुरू करण्याची मागणी होती. त्यानुसार पीएमपीएमएल प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. आजपासून बेबडओव्होळ ते निगडी ही नवी बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पिंपरी चिंचवड, पुणे शहरात येणे सोपे होईल.
ग्रामीण भागात पीएमपीएमएल बससेवेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेप्रमाणेच पीएमआरडीए देखील पीएमपीएमएलसाठी निधी देणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती । Pawana Dam News
– वडगाव फाटा येथील वाहतूक कोंडीवर उपाय योजण्याची गरज ! कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
– पुणे – लोणावळा लोकल : कोरोना काळात बंद झालेली दुपारची लोकल सेवा पुन्हा सुरू करावी