Dainik Maval News : महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात नव्याने एक हजार बस येणार आहेत. यामधील पाचशे बस पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) देणार असून, उर्वरित पाचशे बस पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहेत.
पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकाला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी (दि.12) मंजुरी देण्यात आली. या बैठकीला महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह पीएमपीएमएलचे प्रभारी अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. हे उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना बी. पी. म्हणाले, पीएमपीच्या ताफ्यात सद्य:स्थितीला केवळ 2 हजार बस आहेत. आयुर्मान संपल्याने त्यामधील 300 बस कमी कराव्या लागणार आहेत. पीएमपीला 6 हजार बसची आवश्यकता आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीएमआरडीएने पीएमपीला पाचशे बस द्याव्यात, असे आदेश दिले.
तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी मिळून पीएमपीला पाचशे बस द्याव्यात, असे आदेश यापूर्वीच दिले आहेत. पीएमपी कंपनीच्या हिस्सेदारीनुसार पुणे महापालिकेने 300 तर पिंपरी चिंचवड महापालिकेने 200 बस उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यानुसार पीएमपीसाठी एक हजार बस उपलब्ध होणार आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime