Dainik Maval News : लोणावळा रेल्वे स्टेशनवर रेल्वे संरक्षण दलाच्या दोन कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नवविवाहित प्रवाशाचा जीव वाचला आहे.
शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी चेन्नई एक्सप्रेस (22159) पकडण्याच्या प्रयत्नात 38 वर्षीय प्रवासी श्रुंग गुप्ता यांचा पाय घसरून ते गाडी व प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत पडण्याची वेळ आली.
या गंभीर परिस्थितीत ड्यूटीवर तैनात असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मोहन आणि आरक्षक विपीन कुमार यांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ धाव घेत गुप्ता यांना ओढून सुरक्षित प्लॅटफॉर्मवर आणले.
त्यांच्या समन्वयाने एक मोठा अपघात टळला. श्रुंग गुप्ता हे एक आठवड्यापूर्वीच विवाहबद्ध झाले असून, ते पत्नीसमवेत पंढरपूर येथे जात होते. प्लॅटफॉर्मवर चिक्की घेण्यासाठी उतरले असताना ट्रेन सुटू लागली आणि ती पकडण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली.
सुदैवाने गुप्ता यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या प्रसंगानंतर नवविवाहीत दाम्पत्याने आरपीएफ लोणावळा कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade

