Dainik Maval News : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर सशस्त्र दलातील जवानांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज, मंगळवारी (दि. २० मे) देहू ते वडगाव मावळ अशी तिरंगा यात्रा सर्व पक्षांच्या वतीने काढण्यात येणार आहे.
देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यापासून दुपारी तीन वाजता तिरंगा यात्रेस सुरुवात होणार आहे. या यात्रेत देहू नगरपंचायत येथून सुरुवात होणार आहे. यात देहूमधून ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द, देहूरोड बाजारपेठ, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ या ठिकाणी मोठ्या उत्साहात नागरिक तिरंगा यात्रेत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर देहू येथील मंगळवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नगरपंचायत प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश