Dainik Maval News : मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने देखील पुणे जिल्हा घाट माथा क्षेत्रात पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मावळ तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या पवन मावळ विभागात रविवार, रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून पवना धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणात सद्यस्थितीत ९७.१७ टक्के पाणीसाठा आहे. तसेच सकाळी सहा ते सकाळी दहा या चार तासांत धरण क्षेत्रात तब्बल १९ मि.मी. पाऊस झाला असून पावसाचा जोर वाढतच आहे. सद्यस्थितीत धऱणाच्या सांडव्यावरून कोणताही विसर्ग सुरू नाही. परंतु विद्युतगृहातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती धरण विभागाचे रजनीश बारिया यांनी दिली.
पवन मावळात पावसाचा जोर वाढत आहे. यातही पवना धऱणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. यामुळे धऱणाच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे गरज असल्यास सोमवारी दुपारनंतर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल, असे धरण विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती । Pawana Dam News
– वडगाव फाटा येथील वाहतूक कोंडीवर उपाय योजण्याची गरज ! कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
– पुणे – लोणावळा लोकल : कोरोना काळात बंद झालेली दुपारची लोकल सेवा पुन्हा सुरू करावी