Dainik Maval News : वडगाव शहराचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज व सांगवीचे ग्रामदैवत श्री जाखमाता देवी यांचा महाशिवरात्रीनिमित्त होणारा पारंपारिक भाऊ-बहीण भेटीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.
पोटोबा महाराज व श्री जाखमाता देवी यांचे बहीण-भावाचे नाते मानले जाते. दरवर्षी पोटोबा महाराजांची पालखी महाशिवरात्रीला सांगवी येथे इंद्रायणी नदीकाठी असलेल्या जाखमाता देवीच्या भेटीसाठी नेली जाते. ही परंपरा जुन्या काळापासून सुरू आहे. आजही पोटोबा महाराजांची पालखी भजन, हरिनाम म्हणत भेटीला गेली.सांगवी ग्रामस्थांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.
महादू खांदवे, पुजारी कैलास खांदवे, शंकर पवार व विश्वस्तांच्या हस्ते इंद्रायणी नदीमध्ये पोटोबा महाराजांच्या मूर्तीस स्नान घातल्यानंतर पोटोबा महाराज व जाखमाता देवीची भेट घडविण्यात आली. तसेच, देवीची साडी -चोळीसह ओटी भरण्यात आली. यावेळी पोटोबा देवस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा